(१२) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मँट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना

(१२) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मँट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मँट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना
१. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी मा.प्रधानमंत्री यांनी १५ कलमी कार्यक्रमाअंतर्गत अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता १ली ते १० वी च्या सर्व शासकीय निमशासकीय खाजगी शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मँट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनाने सुरु केली आहे.शासन निर्णय दिनांक २३ जुलै २००८ नुसार इयत्ता १ली ते १० वी पर्यंतच्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी सन २००८-०९ पासुन सदरची योजना नव्याने राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. अल्पसंख्यांक समाजामध्ये केंद्र शासनाने मुस्लीम,ख्रिश्‍चन,शिख,बौध्द व पारशी या धर्माचा समावेश केलेला आहे.
२. त्याची आवश्यकता काय आहे १.अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इयत्ता १ली ते १० वी पर्यंत शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.
२.विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणावर होणारी गळती थांबावी.
३.अल्पसंख्यांक पालकांना त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी.
४.अल्पसंख्यांक मुलांच्या पालकांचा त्यांच्या पाल्यांचा शिक्षणावर होणार्‍या खर्चाचा भर कमी करणे.
३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शासन निर्णय क्रमांक पपंका २००७/(२७०/०७) केपुयो दिनांक २३/०७/२००८ नुसार कार्यवाही केली जाते.
४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी(माध्यमिक)/शिक्षणाधिकारी(प्राथमिक)/शिक्षणाधिकारी(निरंतर) जिल्हा परिषद.
५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा केंद्र शासनाने दिलेल्या विहित नमुन्यात करणे आवश्यक आहे.
६. अर्ज कोठे सादर करावा शाळेमार्फत संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)/शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/शिक्षणाधिकारी(निरंतर) जिल्हा परिषद.
७. सेवा मिळण्यास कालावधी विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर सदर विद्यार्थ्याने बँकेच्या खात्याबाबतची माहिती तसेच नॉन ज्युडिशिअल स्‍टँप पेपर वर उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर संचालनालयाच्या स्तरावरून बँकेमार्फत शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येते.
८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा शाळेकडून संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकार्‍यामार्फत संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे साधावा.