शनीवारचा परिपाठ

दिनांक – 10 सप्टेबर 2016
तिथी – भाद्रपद शु. ०९ शके १९३८
वार – शनीवार
१) राष्ट्रगीत
२) प्रतिज्ञा
३) भारताचे संविधान
४) दिनविशेष -
हा या वर्षातील २५३ वा (लीप वर्षातील २५४ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
२००१:मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती ही स्पर्धा जिंकली.
१९९६:गोमंतक मराठी अकादमीचा पहिला ’कृष्णदास शामा पुरस्कार’ गोमंतकीय मराठी साहित्यिक बा. द. सातोस्कर यांना तर ’पंडित महादेवशास्त्री जोशी मराठी साहित्य पुरस्कार’ कवी नारायण सुर्वे यांना जाहीर
१९६७:जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमधेच राहण्याचा निर्णय घेतला.
१९४३:दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरूवात केली.
१९३९:दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८४६:एलियास होवे याला अमेरिकेत शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९४८:भक्ती बर्वे – अभिनेत्री
१९१२:बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती,
१८८७:गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न (१९५७), मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली.
१८७२:के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९६४:श्रीधर पार्सेकर – व्हायोलिनवादक
१९२३:सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (जन्म: ३० आक्टोबर १८८७)
१९००:रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक
५) व्यक्ती विशेष – बसप्पा धनप्पा जत्ती
बसप्पा धनप्पा जत्ती (सप्टेंबर १०, इ.स. १९१२:सावळगी - जून ७, इ.स. २००२) हे भारताचे उपराष्ट्रपती व कार्यवाहू राष्ट्रपती होते.
यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापुर जिल्ह्यात सावळगी गावात झाला. त्यांनी साइक्स लॉ कॉलेज, कोल्हापुर येथे कायद्याचे शिक्षण घेतले व जमखंडी येथे वकिलीचे काम सुरू केले.
जत्तींनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जमखंडी नगरपालिकेपासून केली. यानंतर ते जमखंडी विधानसभेवर निवडुन गेले. मजल-दरमजल करीत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद व ओडिशाचे राज्यपालपद मिळवले. इ.स. १९७४ ते इ.स. १९८० पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती होते व फेब्रुवारी ते जुलै इ.स. १९७७ या कालखंडात त्यांनी कार्यवाहू राष्ट्रपतीपद सांभाळले. पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती होते. ६) सामान्य ज्ञान:-
ऑस्ट्रेलिया – कांगारुंचा देश.
ओटावा – कॅनडाची राजधानी.
कणाद – प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते हि संकल्पना या ऋषीने मांडली.
करिकाल चोल – चोल राजवंशातील पहिला राजा.
कोपरगाव – प्रसिद्ध शिर्डी मंदिर महाराष्ट्रातील या तालुक्यात आहे.
क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.
खंडी – २० मणाचे माप.
७) सुविचार -
१) ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत
उभीच राहू शकत नाही.
२) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान.
३) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
८) म्‍‍हणी -
१. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. – जवळ असुनही त्या गोष्टीचा उपयोग न होणे.
२. दे गा हरी पलंगावरी।. – फुकट मिळत असल्यास थोडेही कष्ट न करणे.
९) बोधकथा - दोन कोंबडे
एका कोंबडयाने दुसच्या कोंबडयाला खूप जखमी केले. त्या कोंबडयाला आपल्या कर्तबगारीबद्दल इतका गर्व वाटला की, एका खोपटावर बसून मी लढाई जिंकली', 'मी लढाई जिंकली' असे तो मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचवेळी आकाशातून एक गरुड चालला होता. त्याने पाहिले, आणि मारून खाण्यासाठी झडप घालून पकडले. हा सर्व प्रकार तो दुसरा कोंबडा पहात होता. तो अगदी ऐटीत बाहेर पडला व मजेने फिरू लागला.
तात्पर्य- एवढ्यातेवढ्या यशाने कधी फुगून जाऊ नये, कारण कोणाचे नशीब केव्हा फिरेल काही सांगता येत नाही.
१० ) आजचे बातमीपत्र -
११ ) आजचा उपक्रम – अवांतर वाचन आयोजन .
१२ ) आजचे वाढदिवस-
१३ ) समूहगीत/देशभक्तीपर गीत
१४ ) पसायदान