मंगळवारचा परिपाठ

१) दिनांक - ०४ ऑक्टोबर २०१६
२) तिथी – आश्विन शु.०३ शके १९३८
३) वार – मंगळवार
४) दिनविशेष - राष्ट्रीय एकात्मता दिवस
हा या वर्षातील २७७ वा (लीप वर्षातील २७८ वा) दिवस आहे.
जागतिक प्राणी दिन
राष्ट्रगीत
प्रतिज्ञा
संविधान
महत्त्वाच्या घटना:
१९८३ : नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
१९५७ : सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
१९५९ : सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.
१९४३ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
१९४० : ’ब्रेनर पास’ येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.
१९२७ : गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
१८२४ : मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले. जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९३७ : जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री
१९३५ : अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक
१९२८ : ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक
१९१६ : धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक,
१९१३ : सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका
१८२२ : रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९८९ : ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट
१९८२ : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.
१९६६ : अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक
१९४७ : मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ
१९२१ : ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले –गायक अभिनेते.
१८४७ : महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले
१६६९ : रेंब्राँ – डच चित्रकार (जन्म: १५ जुलै १६०६)
५) व्यक्तिविशेष - छत्रपती प्रतापसिंह भोसले
सातार्‍याचे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने सातार्‍याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले.
तथापि छत्रपतींनी इंग्रजांशी संधान साधले म्हणून दुसर्‍या बाजीरावाने त्यांना आपल्यासोबतच ठेवले. तसेच छत्रपतींच्या हितचिंतकांची तुरुंगात रवानगी केली. १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या लढाईत बाजीरावाचा पराभव झाला. तेव्हा बाजीराव पळाला आणि छत्रपती इंग्रजांच्या हाती सापडले. सन १८१८ ला दुसर्‍या बाजीरावाचा पूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली. तथापि, छत्रपतीच्या घराण्याचा आपडौल काय आहे याची इंग्रजांना जाण असल्याने त्यांनी छत्रपतींशी तह करून त्यांना मांडलिक बनवले. सातारा आणि आजूबाजूचा प्रदेश या छोट्याशा राज्यातही छत्रपतींनी काही सुधारणा केल्या. त्या इग्रजांच्या डोळ्यात खुपल्या.
पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते. पण अखेर १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवते. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून १८४८ च्या सुमारास सातारचे राज्य खालसा करण्यात आले.
६) सामान्य ज्ञान -
१ )महाड – रायगड किल्ला या तालुक्यात आहे.
२ )महादेव गोविंद रानडे – हिंदी अर्थशास्त्राचे जनक.
३ )महाराष्ट्र – पोलिसदलात महिलांची नेमनूक करणारे भारतातील पहिले राज्य.
४ )महाराष्ट्र – भारतातील सर्वप्रथम फिरती न्यायालये स्थापन करणारे पहिले राज्य.
५ )महाराष्ट्र – माहितीचा अधिकार कायदा प्रथम पारित करारे राज्य.
७) सुविचार -
१ ) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
२ ) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
३ ) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका
८) म्‍‍हणी -अल्प बुध्दी, बहु गर्वी.
अर्थ – कमी बुद्धी असणा‌याला जास्त गर्व असतो.
९) बोधकथा -
एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. जंगलात हिंश्र पशु असल्‍याने प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हडयात झाडावरून एका खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकीने क्रोधाने पिशाच्‍चावर हल्‍ला केला. त्‍याक्षणी पिशाच्‍च मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचे एक छोटासे मांजर झाले.
तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही.
१० ) आजच्या बातम्या
११) आजचा वाढदिवस
१२) आजचा उपक्रम – क्षेत्र भेट आयोजन
१३) समुहगीत –
१४) पसायदान