गुरुवारचा परिपाठ

दिनांक – 08 सप्टेबर 2016
तिथी – भाद्रपद शु. ०७ शके १९३८
वार – गुरुवार
१) राष्ट्रगीत
२) प्रतिज्ञा
३) भारताचे संविधान
४) दिनविशेष -
हा या वर्षातील २५१ वा (लीप वर्षातील २५२ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
२००१:लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड
२०००:सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.
१९९१:मॅसेडोनियाला (युगोस्लाव्हियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९६६:’स्टार ट्रेक’ या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
१९६२:नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९५४:साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना
१८५७:ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी
१८३१:विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९३३:आशा भोसले – गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्‍या प्रसिद्ध पार्श्वगायिका
१९२६:भूपेन हजारिका – संगीतकार व गायक (मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)
१८८७:स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (मृत्यू: १४ जुलै १९६३)
१८४८:व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)
११५७:रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ एप्रिल ११९९)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९९७:कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ (जन्म: १८ जून १९११)
१९९१:वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी.
१९८२:शेख अब्दुल्ला – शेर - ए - कश्मीर (जन्म: ५ डिसेंबर १९०५)
१९८१:निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी (जन्म: १७ एप्रिल १८९७)
१९६०:फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)
७०१:पोप सर्गिअस (पहिला) – (जन्म: १५ डिसेंबर ६८७)
५) व्यक्ती विशेष – आशा भोसले
आशा भोसले (८ सप्टेंबर, इ.स. १९३३ - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते.त्यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कऱ्हाडे आणि आई देवदासी होत्या. अशा अपत्यांना आता गोमंतक मराठा म्हणतात.
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.
इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्‍या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.
६) सामान्य ज्ञान:-
अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.
अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा.
लॉस एंजेल्स – कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर.
वडोदरा – गुजरातमधील या शहरास सयाजी नगरी या नावानेही ओळखले जाते.
हिरा – सर्वात कठीण धातू.
हेलसिंकी – युरोपखंडातील फिनलंडची राजधानी.
७) सुविचार -
१) जे आपण विचार करतो, तेच बनत जातो - बुद्ध
२) विचार करूनही फायदा होत नसेल, तर खरंच विचार करायला ...
३) असं काम करा की नाव होऊन जाईल.
८) म्‍‍हणी -
१. दिव्याखाली सदैवच अंधार. – दुस-याला उपदेश देणे सोपे असते .
२. दुःख रेड्याला न डाग पखालीला. – महत्वाचे सोडुन निरर्थक कार्य करणे.
९) बोधकथा - घोडा आणि रानडुक्कर
एक तहानलेला घोडा एका ओढ्यावर पाणी पिण्यास गेला असताना एक रानडुक्कर पाण्यात डुबत असलेला त्याने पाहिला. तो रानडुक्कर घोडयाला पाणी पिऊं देईना, तेव्हा घोडा चिडला व दोघे भांडू लागले. तेव्हा घोडयाने एका माणसास, रानडुकराला ठार करण्याची विनंती केली. त्या माणसाने हातात शस्त्रे घेतली आणि घोड्यावर बसून तो निघाला. ओढ्याजवळ येताच त्याने रानडुकराला बाण मारून ठार केले. ते पाहून घोडयास खूप आनंद झाला. परंतु, त्या माणसाने त्यास सोडले नाही. तो म्हणाला, 'मला तुझा खूपच चांगला उपयोग होईल. तेव्हा मी तुला माझ्या तबेल्यात बांधणार हे ऐकताच एका साध्या गोष्टीसाठी आपण आपले स्वातंत्र्य कायमचे गमावल्या बदल घोड्याला वाईट वाटले.
तात्पर्य-दुसऱ्याचा पाडावा करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याची गुलामगिरी पत्करतो तेव्हा आपण कायमचेच गुलाम होतो.
१० ) आजचे बातमीपत्र -
११ ) आजचा उपक्रम – टाकावुतुन टिकावु निर्मीती .
१२ ) आजचे वाढदिवस-
१३ ) समूहगीत/देशभक्तीपर गीत
१४ ) पसायदान