बुधवारचा परिपाठ

दिनांक – 05 ऑक्टोबर 2016
तिथी – आश्वीन शुक्ल ०४ शके १९३८
वार – बुधवार
१) राष्ट्रगीत
२) प्रतिज्ञा
३) भारताचे संविधान
४) दिनविशेष -
हा या वर्षातील २७८ वा (लीप वर्षातील २७९ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
१९९८ : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर
१९९५ : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर
१९८९ : मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९६२ : ’डॉ. नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.
१९५५ : पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्‍घाटन झाले.
१८६४ : एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९७५ : केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री
१९३२ : माधव आपटे – क्रिकेटपटू
१९२३ : कैलाशपती मिश्रा – गुजरातचे माजी राज्यपाल
१९२२ : शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
१९२२ : यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक
१८९० : किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला –’हरिजन’चे माजी संपादक .
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२०११ : स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
१९९७ : चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस
१९९२ : बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, परदेशांतील भारताचे राजदूत
१९९१ : रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक
१९८१ : भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार,
५) व्यक्ती विशेष – यदुनाथ दत्तात्रय थत्ते
यदुनाथ दत्तात्रय थत्ते हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार, एक उत्कृष्ठ लेखक व संपादक, मराठी साहित्यिक होते. हे 'साधना' साप्ताहिकाचे संपादक होते. एक स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच साने गुरुजी यांचे शिष्य होते.नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेले थत्ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महाराष्ट्रातील नेते होते. 1942 साली त्यांना 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी होण्यासाठी सहा महिने कारावास ठोठावण्यात आला होता.यदुनाथ दत्तात्रय थत्तेयानविपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली.त्यांचा मृत्यू मे 10, 1998 ला झाला.
६) सामान्य ज्ञान :-
* इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
* रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
* अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
* चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
* भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
७) सुविचार -
१ ) जे तलवार चलवतील ते तलवारीनेच मरतील.
२ ) मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
३ ) दुष्टांच्या संगतीत सदाचार लोप पावतो.
८) म्‍‍हण - चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे.
अर्थ– व्यक्तीची लायकी पाहुनच त्याला कार्य द्यावे.अन्यथा अनर्थ घडु शकतो .
९) बोधकथा – अंतरंगाची परीक्षा
एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.
तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.
१० ) आजचे बातमीपत्र -
११ ) आजचा उपक्रम – वक्रुत्व स्पर्धा आयोजन .
१२ ) आजचे वाढदिवस-
१३ ) समूहगीत/देशभक्तीपर गीत
१४ ) पसायदान