सोमवारचा परिपाठ

दिनांक :- ०३/१०/२०१६
वार :- सोमवार
मराठी तिथी:- आश्विन शुक्ल ०२ शके १९३८
हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७६ वा किंवा लीप वर्षात २७७ वा दिवस असतो.
१) *राष्ट्रगीत*
२) *प्रतिज्ञा*
३) *संविधान*
४) *ठळक घटना आणि घडामोडी*
२३३३ - चीनी सम्राट याओच्या राज्यकालादरम्यान सध्याच्या कोरियामध्ये गोजोस्योन राष्ट्राची स्थापना.
१७३९ - रशिया व ऑट्टोमन साम्राज्यात निसाचा तह.
१८६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकननेदरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थँक्सगिविंग दिनम्हणून पाळण्याचा आदेश दिला.
१९०८ - व्हियेनामध्ये लेओन ट्रोट्स्की, एडॉल्फ जॉफ,माटव्हे स्कोबेलेव्ह व इतर रशियन नागरिकांनी प्रावदा हे बातमीपत्र सुरू केले.
१९१८ - बोरिस तिसरा बल्गेरियाच्या राजेपदी.
१९२९ - सर्बिया क्रोएशिया व स्लोव्हेनियाने एकत्र येउनयुगोस्लाव्हिया राष्ट्राची निर्मिती केली.
१९३२ - इराकला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
१९३५ - इटलीने इथियोपियावर हल्ला केला.
१९४२ - जर्मनीतील पीनेमुंडे येथील तळावरून सर्वप्रथम व्ही-२ ए-४ क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण. हे क्षेपणास्त्र म्हणजे अंतराळात पोचलेली सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
१९८१ - बेलफास्टमधील मझे कारागृहातीलबंदीवास्यांचे उपोषण सात महिन्यांनी संपले.
१९८५ - स्पेस शटल अटलांटिसने अंतराळात प्रथमतः झेप घेतली.
१९९० - पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण.
१९९५ - ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नीनिकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्याखूनाच्या आरोपातून सुटका.
२०१३ - लिब्यातून निघालेल्या निर्वासितांची नावइटलीजवळ बुडून १३४ मृत्युमुखी.
५) *जन्म/वाढदिवस* :-
१८६२ - जॉनी ब्रिग्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९१ - विल्यम लिंग, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९०५ - एरॉल हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९११ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९२१ - रे लिंडवॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९५२ - गॅरी ट्रूप, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९७३ - नीव्ह कॅम्पबेल, केनेडीयन अभिनेत्री.
१९८० - सॅराह कॉल्येर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९८४ - ऍशली सिम्पसन, अमेरिकन गायिका.
६) *म्रुत्यु/पुन्यतिथी*:-
१२२९ - संत फ्रांसिस.
१५६८ - व्हाल्व्हाची एलिझाबेथ.
१५९६ - फ्लोरें क्रेस्टियें, फ्रेंच लेखक.
१९२९ - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
७) *व्यक्तीविशेष*:- महात्मा गांधी
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ -जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापूम्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधीसविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.
गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विसटर्न चर्चिल याने त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.
८) *बोधकथा*- गाढव आणि लांडगा
एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, वैद्यबुवा ! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून द्या. लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेनेनिघून गेले.
तात्पर्य- काही माणसे इतकी कृतघ्न असतत, की ज्याने आपल्याला संकटातून वाचविले त्याच्याशीसुद्धा ते शिष्टपणे वागतात.
९) *सामान्यज्ञान*:-
1 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो?(रातआंधळेपणा) 2 मधुमेह हा आजार कोणत्या अवयवातील बिघाडामुळे होतो ? (स्वादुपिंड)
3 तंबाखूमध्ये कोणते अपायकारक द्रव्य असते ? (निकोटिन)
4 मोतिबिंदु हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?(डोळे ) 5 डासांमुळे होणारे रोग कोणते ?(मलेरिया, डेंग्यू)
१०) *सुविचार*:-
१)नशीबाला एक वाईट सवय असते . ते नेहमी त्यालाच साथ देते की , जो त्याच्यावर अवलंबून
२) चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस
११) *म्हणी*
म्हण: उंदराला मांजर साक्ष.
मांजराने उंदराच्या बाजूने साक्ष देणे त्याच्या हिताचे असते, कारण उपकाराचा मोबदला तो उंदराला गट्ट करून घेणार. यावरून ज्याचा हितसंबंध एखाद्या गोष्टींत आहे त्याला त्याबद्दल विचारणें हे न्यायाचे व फायदेशीर नाही.
१२) *आजच्या बातम्या*:-
१३) *आजचा वाढदिवस*:-
१४) *स्फूर्तिगीत*:-
१५) *आजचा उपक्रम*:- थोर व्यक्तींची माहिती संग्रहित करणे.
१६) *पसायदान*: