(६) स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मागासवर्गीय अनुदानीत वसतिगृहांना सहाय्यक अनुदाने.

() स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मागासवर्गीय अनुदानीत वसतिगृहांना सहाय्यक अनुदाने.

उद्देश

  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुर्ण करता यावा, ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यामधील गळतीचे प्रमाण कमी व्हावे. आर्थिक दुरावस्थेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने ही योजना सन १९५०.५१ पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
लाभाचे स्वरुप
  • कर्मचारी वेतन - वसतिगृह अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस व चौकीदार यांना एकत्रित वेतन / मानधन देण्यात येते.
  • परिपोषण अनुदान - प्रति विद्यार्थी प्रतिमहा रु. ९००/- प्रमाणे १० महिन्याकरीता शासनाकडून निवासी विद्यार्थ्यासाठी परिपोषण अनुदान देण्यात येते.
  • इमारत भाडे - इमारत भाडयापोटी सार्वजनीक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या ७५ टक्के भाडे संस्थेस देण्यात येते.
  • सोयी सुविधा - निवास, भोजन, अंथरुण पांघरुण, क्रिडा साहित्य इ. सोयी सुविधा मोर्फत देण्यात येतात.
  • वसतिगृह प्रवेश - अनुदानीत वसतिगृहामध्ये अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्याबरोबर मांग, वाल्मिकी, कातकरी व माडीया या प्रवर्गातील स्थानिक विद्यार्थ्यांना आणि अनाथ, अपंग व निराश्रीत विद्यार्थ्यांना तसेच विजाभज, इमाव व आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने विहित टक्केवारीच्या अधीन राहून प्रवेश देण्यात येतो.