(७) स्वयंसेवी संस्थामार्फत अपंगांना विशेष शिक्षण देणा-या अनुदानीत विशेष शाळा / कर्मशाळा.

() स्वयंसेवी संस्थामार्फत अपंगांना विशेष शिक्षण देणा-या अनुदानीत विशेष शाळा / कर्मशाळा.

उद्देश

  • विशेष शाळा - ६ ते १८ वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना मोफत विशेष शिक्षण.
  • विशेष कार्यशाळा - १८ ते ४५ वयोगटातील अपंग किवा प्रौढ व्यक्तींना मोफत विशेष प्रशिक्षण.
निकष
  • विशेष शाळा - अंध, मूकबधीर, मतीमंद व अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पध्दतीने व विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करुन मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे यासह निवास व भोजनाची व्यवस्था करणे.
  • विशेष कार्यशाळा - अंध, मूकबधीर, मतीमंद व अस्थिव्यंग प्रौढ व्यक्तींना विशेष प्रशिक्षणाव्दारे अपंगत्वानुसार विविध व्यवसायाचे विशेष प्रशिक्षण देणे. यासह मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करणे.
स्वयंसेवी संस्थांना वेतन - कर्मचारी आकृतीबंधाप्रमाणे मान्य कर्मचा-यांचा १०० टक्के वेतन खर्च.
स्वयंसेवी संस्थांना वेतनेतर अर्थसहाय्य - वेतन खर्चाच्या ८ टक्के मर्यादेत.
इमारत भाडे - सार्वजनीक बांधकाम विभागाच्या इमारत भाडे प्रमाणपत्राप्रमाणे मान्य क्षेत्रफळाचे ७५ टक्के इमारत भाडे.
परिपोषण अनुदान - अंध, कर्णबधीर व अस्थिव्यंग प्रवर्गातील निवासी विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी रु. ९००/- व मतीमंद प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी रु. ९९०/- प्रमाणे १० महिन्याकरीता.