१ |
सेवेचे नाव किंवा उपक्रम(विषय) |
पूर्व माध्यमिक व
माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार्या
पूर्व माध्यमिक इयत्ता ४ थी च्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ५ वी
ते ७ वी व माध्यमिक स्तरावर इयत्ता ७ वी च्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे
इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. |
२ |
त्याची आवश्यकता काय? |
गुणवान विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास
प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. |
३ |
कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? |
शासन निर्णय शालेय शिक्षण
व क्रीडा विभाग क्रमांक एससीएच -२००९ /(९०/०९) केंपुयो दिनांक २२/७/२०१०
नुसार पूर्व माध्यमिक स्तरावर दर रुपये १०० द.म.(दहा महिण्यासाठी)व
माध्यमिक स्तरावर दर रुपये १५० द.म.(दहा महिण्यासाठी)सदर शासन
निर्णयानुसार सन २००९-१० या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती पात्र
लाभार्थ्यांना बँकेमार्फत शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. |
४ |
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा? |
शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय |
५ |
माहितीसाठी अर्ज-किती प्रती,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत |
आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व
सविस्तर तपशिल अर्जात करणे आवश्यक आहे.सबंधित शाळेच्या मुख्याध्यापकां
मार्फत शि.अ.(माध्य.)जि.प. यांचेकडे |
६ |
अर्ज कोठे सादर करावा? |
सबंधित शाळेच्या मुख्याध्यापकां मार्फत सबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद कार्यालय |
७ |
सेवा मिळण्यास कालावधी ? |
अनुदान उपलब्धतेनुसार |
८ |
उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? |
सबंधित जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक )महाराष्ट्र राज्य पुणे -१ |