शुक्रवारचा परिपाठ

दिनांक – 09 सप्टेबर 2016
तिथी – भाद्रपद शु. ०८ शके १९३८
वार – शुक्रवार
१) राष्ट्रगीत
२) प्रतिज्ञा
३) भारताचे संविधान
४) दिनविशेष -
हा या वर्षातील २५२ वा (लीप वर्षातील २५३ वा) दिवस आहे.
आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन,भारतीय ग्रंथालय दिन,भारत छोडो दिवस
महत्त्वाच्या घटना:
२०००:भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर
१९९३:छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
१९७५:पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
१९६५:मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
१९४५: अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला.
१९४२:’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
१९२५:भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा
११७३:पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९२०:कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.
१९०९:डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ
१८९०:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते
१७७६:अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ
१७५४:पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००२:शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी
१९७६:जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार
१९०१:विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक,
११७:ट्राजान – रोमन सम्राट (जन्म: १८ सप्टेंबर ५३)
५) व्यक्ती विशेष – विष्णुदास अमृतराव भावे
विष्णुदास अमृतराव भावे (१८१९ - ऑगस्ट ९, १९०१) हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.विष्णुदास भाव्यांचा जन्म सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. ज्यांच्याकडून अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकेल अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला.
विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.
5 नोव्हेंबर 1853 रोजी विष्णुदास भावेंनी ‘सीतास्वयंवर’चा पहिला प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली, असे आपला इतिहास सांगतो. पण विष्णुदास भावेंनी नाटकच का केले असेल? त्यांना नाटक करायचे का सुचले असावे बरे? या प्रश्नानेच मला अनेक दिवस ग्रासले होते. विष्णुदास भाव्यांचे वडील अमृत भावे हे सांगलीचे संस्थानिक पटवर्धन यांच्या दरबारात लष्करी हुद्द्यावर होते. पटवर्धन राजांना कलांची भारी आवड. अनेक कलांबरोबरच कर्नाटकातील करकी या गावातील भागवतमेळा हा लोकधर्मी यक्षगानाचा प्रकार राजांनी 1942 मध्ये दरबारात आयोजिला होता. ते पाहून राजांनाही वाटले की आपल्या इथेही अशी कला सादर व्हावी. मग कोण प्रयत्न करणार बरे? राजांना अमृत भावेंचा मुलगा विष्णुदासाबद्दल आणि त्याच्या कामाबद्दल नक्कीच माहिती असणार. कारण तरुण विष्णू चित्रकला, शिल्पकलेबरोबरच कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करत असे. राजांनी विष्णूला बोलावून अशा प्रकारचा नाट्यप्रयोग सादर करण्याची जबाबदारी सोपवली. यक्षगानाचा तो खेळ विष्णुदासानेही पाहिलेला असल्याने त्याच्यावरही यक्षगानाचा प्रभाव पडणे ओघानेच आले. त्यामुळे आपल्या लोककला आणि यक्षगानातील आवश्यक तो भाग घेऊन विष्णुदासाने सीतास्वयंवराची मांडणी केली आणि पहिला प्रयोग राजांच्या समोर दरबारात 5 नोव्हेंबर 1843 रोजी सादर केला.
असा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी पहिल्या प्रयोगात कुणी बरे काम केले असावे? मुळात सादर होणारे ते पहिले नाटक. त्यामुळे आपल्याकडे आजच्यासारखे तयार नट असण्याचे कारणच नाही. मग विष्णुदासांनी मुख्य भूमिकांसाठी कोकणातून दशावतारात काम करणारी गाणारी मुले आणली. पण ती चार-दोनच. मग बाकीच्या पात्रांचे काय करणार? तालमीला संध्याकाळी वेळ देऊ शकणारे आणि सामान्य अर्थाने रिकामे असणारे लोक हेच नाटकासाठी पात्र ठरणार होते. मग दरबारातले आचारी, पाणके, भट इ. रिकामटेकड्या लोकांची वेगवेगळ्या भूमिकांसाठी निवड झाली. पहिला प्रयोग सादर झाला. राजांना आवडला. दरबारातल्या वेगवेगळ्या सणांना, कार्यक्रमांना या नाटकाचे प्रयोग होऊ लागले. पण 1951 मध्ये पटवर्धन राजांचे निधन झाले आणि विष्णुदासांची नाट्यकला पोरकी झाली.
६) सामान्य ज्ञान:-
अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.
अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.
अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.
ओस्लो – नॉर्वेची राजधानी.
कपिल – सांख्य दर्शनाचा प्रवर्तक.
कर्कवृत्त – भारताच्या मध्यातून हे वृत्त जाते.
कल्ले – मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात.
७) सुविचार -
१) न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न कारण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं .
२) रोज काहीतरी उपयुक्त वाचून आत्मसात करायला शिका .
३) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
८) म्‍‍हणी -
१. दिवस गेला उटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत. – वेळ निघुन गेल्यावर कमाची सुरवात करणे.
२. देखल्या देवा दंडवत. – जो जो सामोरे येईल त्याचे गुनगान करणे.
९) बोधकथा - गाढव आणि लांडगा
एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, वैद्यबुवा ! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून द्या. लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेनेनिघून गेले.
तात्पर्य- काही माणसे इतकी कृतघ्न असतत, की ज्याने आपल्याला संकटातून वाचविले त्याच्याशीसुद्धा ते शिष्टपणे वागतात.
१० ) आजचे बातमीपत्र -
११ ) आजचा उपक्रम – वैयक्तीक स्वक्छता .
१२ ) आजचे वाढदिवस-
१३ ) समूहगीत/देशभक्तीपर गीत
१४ ) पसायदान